About Me

My photo
i believe strongly in my dreams. my family, friends bring happiness to my life and complete me.

Saturday, 23 April 2011



महिलांसाठी राखीव 

ट्रेनमधील ladies compartment ही एक जादूची पोतडीच म्हणावी लागेल. एक मुलगी असुनही मला नेहमी प्रवास करताना ह्याबद्दल अप्रूप वाटत आल आहे. वर्षानुवर्ष ट्रेनने प्रवास करणार्या ह्या बायकांचा डबा म्हणजे त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झालेला असतो. काय काय होत नाही ह्यामध्ये??  
भाजी चिरन्यापासून ते जप करेपर्यंत, अभ्यास ते अवांतर वाचन, शिवनकाम एवढच नव्हे तर कपडे , पिन्स वगैरे गोष्टी खरेदी करण्याची हक्काची जागा म्हणजे ladies  डब्बा..
रोज एक ठराविक ट्रेनने प्रवास करणार्या बायकांचा मग एक ग्रुप बनतो.रोज तो ग्रुप त्याचवेळी त्याच ट्रेन मध्ये भेटतो. मग एकमेकांसाठी जागा धरण, त्या जागेवर बाकी कोणाला बसु न देण , वेगवेगले festivals साजरे करण, एकमेकिंची सुख- दुःख share करण हे सगल ओघाने आलच..
एकदा मी churchgate वरुण अँधेरीला येत असताना चार पाच बायका ट्रेनमध्ये गाण्याचा रियाझ करत होत्या. काही जनींचे सुर लागत होते काही उगाच ओरडत होत्या. आजुबाजुच्या बायका त्यांच्याकडे बघत हसत होत्या, त्यांना दाखवून चिडवत होत्या. पण त्या बायकांना काहीही फरक पडत नव्हता. एवढा स्वात्रंत्य ladies डब्बा सोडून अजुन कुठे मिळणार??
ladies  डब्बा म्हणजे प्रत्येक स्टेशन ला एक भान्दन ठरलेल..मग तो फर्स्ट क्लास असो किंवा सेकंड क्लास.. तो कलकलात सारखाच..
पण खर्या मैत्रीनीही ट्रेन मध्येच भेटतात.. वर्षानुवर्ष एकत्र प्रवास करीं ह्या बायका आयुष्यातील कितीतरी टप्पे देखिल एकत्रच पार करतात. 
किती विविधता असते ह्या बायकांमध्ये.. कॉलेज मधील मुलींपासून ते retire होत असणार्या बायकांपर्यंत , एखाद्या मोठ्या कंपनी ची CEO ते एखाद्या हॉस्पिटलची nurse किंवा आया, एखादी तरुण मुलगी आणि तिची आई किंवा एखाद तान्हा बाल आणि त्याची आई.
बोलण आणि बायका यांच तर अटूट नात आहे.. मग जर बायकांचाच डब्बा असेल तर काय.. बोलण्याला उधाण येत. अनेक बायका अनेक विषयांवर अनेक भाषांमध्ये एकत्र बोलत असतात.कधी लक्षपूर्वक त्याचा बोलण एकल ना तर त्या इतका मस्त टाइमपास नाही.tv वरील मालिका, मुलामुलिंचे अभ्यास, शाला , कॉलेज affairs (त्यांच्या भाषेत लफडी किंवा भानगडी), नवीन खरेदी केलेल्या वस्तु, दागिने,आणि हे कमी म्हणून की काय  भरिस भर नवरे हां कधीही न संपणारा विषय आहेच.
थोड्या young मुलींचे विषय थोड़े वेगले असत्तात.shopping , hot guys , practicles , canteen , boyfriends , crushes , affairs , सिनेमा ह्या आणि अनेकविध विषयांवर ह्या सगल्या अखंड बोलत असतात. ह्या मुलीचा टॉप किती  गोड़ आहे, किंवा ती किती गोरी आहे, नाहीतर फ़ोन आहेच गप्पा मारायला..
ज्या मुली कानात गाणी लावून किंवा मान खली घालून बसतात किंवा झोपलेल्या असतात त्यांच्या निरिक्षण शक्तीच्या अभावामुले मला त्यांची कीव कराविशी वाटते.. आजुबाजुला एवढ्या interesting गोष्टी चालू असताना ह्या एवढ्या नीरस कशा असू शकतात?so sad ..
तर थोडक्यात काय .. पुरुषांसाठी कायम कुतुहलाचा विषय असलेला हा ladies डब्बा.. त्यातील बायका, त्याचे विषय सतत असेच चालू राहणार..मग मेट्रो ट्रेन येवोत किंवा काहीही..
 म्हणुनच म्हणतात ना... महिलांसाठी राखीव !!!
-अंकिता      

No comments:

Post a Comment